HW News Marathi
राजकारण

‘भीम आर्मी’च्या मुंबईतील कार्यक्रमाला परवानगी देण्यास पोलिसांचा नकार

मुंबई | कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी ‘भीम आर्मी’च्या कार्यक्रमाला परवानगी देण्यास नकार दिला आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या कार्यक्रमासाठी भीम आर्मीने वरळीतल्या जांबोरी मैदानात त्याचप्रमाणे दादरच्या चैत्यभूमी परिसरात कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परवानगी मागितली होती. परंतु, मुंबई पोलिसांनी या कार्यक्रमासाठीची परवानगी नाकारली आहे.

“भीम आर्मीने शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंच्या मुंबईतील कार्यक्रमाला विरोध केल्याने जाणूनबुजून पोलीस आमच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली”, असे भीम आर्मीने म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे भीम आर्मीच्या मुंबईतील नेत्यांनी पोलिसांवर आपला आवाज दडपल्याचा आरोप केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी लवकरच मंत्री मंडळात असेन | नारायण राणे

Adil

इंधन दर कपातीनंतर अरुण जेटलींचे विरोधकांना प्रत्युत्तर

Gauri Tilekar

मला नाव कमाविण्यापेक्षा सर्वसामान्यांचे आशीर्वाद कमवायचे आहेत !

News Desk