HW News Marathi
राजकारण

राहुल गांधीच्या जॅकेटवरून राजकारण तापले

सिलॉँग | काही दिवसांपूर्वी 15 लाखांचा मोदी नावा सूट घातल्यामुळे मोदींवर चौफेरे टीका झाली होती. त्यानंतरही मोदी महागडे कपडे घालून आपल्या श्रीमंतीची दर्शन घडवत आहेत. मोदी पाठोपाठ आता राहुल गांधी महागड्या जॅकेटमुळे चर्चेत आले आहेत. मेघालयातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ७० हजार रुपये किमतीचे जॅकेट घातले होते.

उत्तराखंडच्या निवडणुकीदरम्यान कुर्त्याचा फाटलेला खिसा दाखविणारे राहुल यांना महागडे जॅकेट कसे चालते? असा सवाल भाजपने केला आहे. मेघालयाच्या सरकारी खजिन्यावर डल्ला मारल्यानंतर राहुल यांनी काळ्यापैशातूनच हे जॅकेट खरेदी केले आहे,असा आरोप करतानाच आमच्या जखमांवर मीठ चोळून संगीत कार्यक्रमाला हजेरी लावण्यापेक्षा राहुल गांधी मेघालय सरकारचा कार्यअहवाल सादर करू शकले असते,अशी टीका भाजपने केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हा बाबा सकाळी लवकरच शपथ घेत असतो !

News Desk

स्वाभिमानी-आघाडीच्या नेत्यांची आज महत्वपूर्ण बैठक

News Desk

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची बैठक संपली; बंडखोराबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Aprna