HW News Marathi
राजकारण

देशभरात १३ राज्यांत ९७ जागांसाठी आज होणार मतदान

मुंबई | देशभरात आज (१८ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात देशभरातील १३ राज्यांमध्ये ९७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर राज्यात एकूण १० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. देशात एकूण ७ टप्प्यात मतदान पार पडणार असून २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

या टप्प्यात सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात होणारी प्रकाश आंबेडकरांची लढत पहायला मिळणार आहे. तर अमरावतीत शिवसेनेचे आनंदराव आडसूळ विरुद्ध नवनीत राणा असा सामना बघायला मिळणार आहे. शेवटच्या दिवशीच्या प्रचारासाठी या राजकीय नेत्यांची लगबग बघायला पाहायला मिळाली होती.

महाराष्ट्रातील १० मतदारसंघात १८ एप्रिलला मतदान होणार

सोलापूर

नांदेड

लातूर

बीड

उस्मानाबाद

बुलढाणा

अकोला

अमरावती

हिंगोली

परभणी

दुसऱ्या टप्प्यात या १३ राज्यात ९७ जागांसाठी मतदान होणार

आसाम – ५

बिहार – ५

छत्तीसगड – ३

जम्मू काश्मिर – २

कर्नाटक – १४

महाराष्ट्र – १०

मणिपूर – १

ओदिशा – ५

तामिळनाडू – ३९ (सर्व)

त्रिपुरा – १

उत्तर प्रदेश – ८

पश्चिम बंगाल – ३

पुदुच्चेरी – १

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 कन्हैय्या कुमारसह १० जणांवर आरोपपत्र दाखल

News Desk

#RamMandir : न्यायालयाने देशाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत !

News Desk

निसर्गावर बोलू काही…

News Desk