HW News Marathi
राजकारण

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचा संभाव्य खातेवाटप

मुंबई | शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाला आहे. भाजपचे 9 तर शिंदे गटातील 9 एकूण 18 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. तब्बल 38 दिवसांनंतर शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असून  या मंत्रिमंडळामध्ये उत्तर महाराष्ट्रातून तब्बल पाच आमदारांची मंत्री पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात उत्तर महाराष्ट्राला झुकते माप दिले दिसून येत आहे.

मालेगावचे दादा भुसे, जळगावचे गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, नंदुरबाराचे विजयकुमार गावित यांच्यासह नगरचे राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्री मंडळात स्थान देण्यात आलं आहे. तर. शिंदे सरकारमध्ये औरंगाबाद जिल्ह्याला एकूण तीन मंत्रिपद मिळाली आहेत. पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदिपान भुमरे, औरंगाबाद पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांना संधी मिळाली आहे. या मंत्र्यांना शिंदे-फडणवीसांना ही खाते मिळणार असल्याची माहिती माध्यमांतून मिळाली आहे.

 

शिंदे सरकारचा संभाव्य खाते वाटप –

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे –  नगरविकास
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –  गृह, अर्थ
  • राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, सहकार
  • चंद्रकांत पाटील -सार्वजनिक बांधकाम
  • सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वन
  • गिरीश महाजन – जलसंपदा
  • दादा भुसे – कृषी
  • गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
  • दीपक केसरकर – पर्यटन आणि पर्यावरण विभाग
  • शंभुराज देसाई – उत्पादन शुल्क
  • सुरेश खाडे – समाजिक न्याय
  • संदीपान भुमरे – रोजगार हमी
  • तानाजी सावंत – उच्च व तंत्रशिक्षण
  • रविंद्र चव्हाण – गृहनिर्माण
  • अब्दुल सत्तार – अल्पसंख्यांक विकास
  • विजायकुमार गावित – आदिवासी विकास
  • मंगलप्रभात लोढा – विधी व न्याय
  • संजय राठोड – ग्रामविकास
  • अतुल सावे – आरोग्य
  • उदय सामंत – उद्योग
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एक्झिट पोलच्या माध्यमातून हजारो ईव्हीएम्समध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न !

News Desk

चोराच्या उलट्या बोंबा

swarit

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाबाबतचा सुधारीत प्रस्ताव प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत आणावा

Aprna