सोलापूर | भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सोलापुरमध्ये सभा घेतली होती. या सभेला कार्यकर्त्यांनी प्रंचंड प्रतिसाद दिला त्यामुळे सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे दलित समाज प्रकाश आंबेडकर यांच्या मागे एकवटल्याचे चित्र काल सोलापूरमध्ये पहायला मिळाले. त्यामुळे आगामी निवडणुकीत सुशिलकुमार शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
सुशिकुमार शिंदे हे दलितांचा चेहरा म्हणून ओळखले जातात. परंतु २०१४ ला मोदी लाटेमुळे त्यांचा पराभव झाला होता. मात्र आगामी निवडणुकीसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होवू लागले आहे. त्यातच आता भारीप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या एंन्ट्रीमुळे सुशीलकुमार शिंदे यांनी फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारच्या आंबेडकर यांच्या सभेमुळे सोलापुरमध्ये प्रकाश आंबेडकरांना मिळणारा प्रतिसाद सुशिलकुमार शिंदेंसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.