HW Marathi
राजकारण

वसंतदादा पाटील यांचा नातू प्रतिक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

मुंबई | सांगलीतून काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा नातू प्रतिक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.काँग्रेसला वसंतदादा घराणे नको आहे. म्हणून मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे. यापुढे काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक नाही तर आमचे बंधू विशाल पाटील यांनी अपक्ष लढावे, असे त्यांनी सांगितले.

वसंतदादाच्या नावाने सामाजिक क्षेत्रात काम करणार असल्याचे प्रतिक यांनी म्हटले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाची काँग्रेसची परंपरागत जागा आहे. काँग्रेसने उमेदवारीत डावलले गेलेल्यामुळे प्रतीक पाटील यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जाते. तसेच प्रतिक हे सध्या भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क वाढविला आहे. दोघांची नुकतीच भेट झाल्याने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

Related posts

एका निरपराध व्यक्तीच्या मृत्यूला राहुल गांधी जबाबदार !

News Desk

सत्तेवर लाथ कशी मारायची हे शिकवण्यासाठी शिवसेनेला गाढव दिले पाहिजे – धनंजय मुंडे

News Desk

‘मीटू’ मोहिमेच्या तक्रारीनंतर लवकरच कायदेतज्ज्ञाची समिती

अपर्णा गोतपागर