HW News Marathi
राजकारण

प्रतीक शिवशरण या ९ वर्षांच्या मुलाच्या हत्येची सीआयडी चौकशी करण्यात यावी !

मंगळवेढा | येथील मचनूर या गावातील अवघ्या 9 वर्षांच्या प्रतीक शिवशरण या मुलाची हत्या होऊन 15 दिवस झाले तरी एकाही आरोपीला स्थानिक पोलिसांनी अटक केलेले नाही. त्यामुळे या संवेदनशील असलेल्या प्रतीक शिवशरण हत्या प्रकरणाची सी आय डी मार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. मचनूर मधील हत्या झालेल्या दिवंगत प्रतीक शिवशरण च्या शोकाकुल कुटुंबियांची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी रिपब्लिकन पक्षातर्फे शोकाकुल शिवशरण कुटुंबीयांना दीड लाख रुपयांचा सांत्वनपर निधी आठवलेंच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

प्रतीक शिवशरण या निरागस 9 वर्षांच्या बाळाची हत्या नरबळी असण्याची शक्यता ना रामदास आठवले यांनी वर्तविली असून या प्रकरणी अद्याप ऍट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणी ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची सूचना ना रामदास आठवले यांनी पोलीस प्रशासनाला केली. स्थानिक पोलीस प्रशासनाने या प्रतीक शिवशरण हत्येच्या प्रकरणात अद्यापही आरोपीला अटक न केल्याने तसेच तपासात दिरंगाई केल्याने स्थानिक गावकरी पोलीस प्रशासनावर नाराज असून या गुन्ह्याचा तपास सी आय डी मार्फत करण्याची मागणी गावकाऱ्यांनी यावेळी ना रामदास आठवले यांच्या कडे केली.

मचनूर गावातील प्रतीक शिवशरण या 9 वर्षांच्या मुलाची हत्या झाल्याचे कळताच ना रामदास आठवले यांनी मंगळवेढ्यातील मचनूर गावात भेट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज सकाळी त्यांनी मचनूर गावातील शोकाकुल शिवशरण परिवाराची सांत्वनपर भेट घेतली.

जिल्हा पोलिस प्रशासनावर रामदास आठवले नाराज

या तालुक्यात प्रतीक शिवशरण हत्या प्रकरण हे अत्यंत संवेदनशील प्रकरण ठरले असतानाही या दौऱ्यात स्थानिक पोलीस प्रशासनाचे कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले या गावात भेट देणार असल्याने राजशिष्टाचाराचे कोणतेही नियम जिल्हा प्रशासनाने पाळले नसून रामदास आठवलेंना असलेली झेड सुरक्षा पुरविण्यात आलेली नाही. मचनूर गावात भेट दिली त्यावेळी जिल्हा पोलिस प्रशासनाचे कोणीही एसपी; ऍडिशनल एस पी; डी वाय एसपी; वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच स्थानिक पोलीस अधिकारीही गैरहजर होते. तसेच समाज कल्याण खात्याचे स्थानिक अधिकारीही गैरहजर होते. जिल्हा पोलिस आणि प्रशासनाच्या या बेजबाबदार वृत्तीमुळे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले नाराज आणि संतप्त झाले असून या सर्वांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान प्रतीक शिवशरण च्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्वरीत अटक न केल्यास मंगळवेढयामध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे दि 22 नोव्हेंबर रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा रिपाइं चे महाराष्ट्र्र प्रदेश सरचिटणीस तथा महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राज सरवदे यांनी दिला आहे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या दौऱ्यात त्यांच्यासमवेत रिपाइंचे राजभाऊ सरवदे;सुनील सर्वगोड; जोतेंद्र बनसोडे; अशोक सरवदे; संतोष पवार; अशोक शिवशरण; युवराज सावंत ; राजरत्न इंगळे; किर्तीपाल सर्वगोड; कुमार भोसले; दीपक चंदनशिवे; बाबा साखरे; गणेश भोसले ; नितीन सोनवले ; अविनाश मडीखांबे;रातीलाल सावंत ; सिद्धू माने आदी रिपाइं चे अनेक

पदाधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

योगी आदित्यनाथ यांची ओवेसींना धमकी ?

News Desk

आपण एकत्र राहिलो तर भाजपचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही !

News Desk

राफेल प्रकरणी मोदींना क्लिन चिट देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

News Desk