HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई | संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये आज (३० मार्च) प्रवेश केला आहे. गायकवाड यांना काँग्रेसच्या तिकीटावर पुण्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. गायकवाड त्यांच्या समर्थकांसह मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईच्या टिळक भवनात काँग्रेसची बैठक सुरू आहे. आता गायकवाड यांनी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यातून कोण लढणार याबाबतचा निर्णय आज (ता.३०) संध्याकाळपर्यत होणार आहे.

रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्याने पुण्याची जागा राष्ट्रवादीला येईल, अशी चर्चा काल (२९ मार्च) पुण्यात रंगली होती.  तसेच झाल्यास राष्ट्रवादीकडून प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीत  महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

Related posts

राहुल गांधीच पंतप्रधान व्हावेत ! – मल्लिकार्जुन खर्गे

News Desk

‘हा’ टॉलिवूड अभिनेता पंतप्रधान मोदींविरोधात लढणार

News Desk

चंद्राबाबू नायडू यांनी घेतली राहुल गांधींची भेट

News Desk