HW News Marathi
राजकारण

गोव्यात काँग्रेस आमदारांकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर 

पणजी | आगामी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणात नेतृत्त्वबदलाच्या हालचालींना मोठा वेग आला आहे. येणाऱ्या काही दिवसात गोव्याच्या राजकारणात मोठा बदल होणार असल्याची शक्यता आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून ठीक नाही. काहीच दिवसांपूर्वी त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. गोव्यात काँग्रेसच्या आमदारांनी राजभवनात जाऊन सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

परंतु राजभवनात काँग्रेसच्या आमदारांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेता आली नाही. गोवा काँग्रेसचे चार आमदार सरकार बनविण्याचा प्रस्ताव घेऊन राजभवनात गेले होते. परंतु राज्यपाल मृदुला सिन्हा त्यावेळी तेथे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे काँग्रेसचे आमदार राज्यपालांच्या निवासस्थानी दोन पत्र देऊन आले आहेत. ह्यात पत्रात १६ आमदारांच्या सह्या आहेत. काँग्रेसच्या आमदारांनी राज्यपाल निवासावर दिलेल्या या पत्रात काँग्रेसने इतर काही पक्षाच्या आमदारांना सरकार बनविण्याची संधी द्यावी अशी मागणी केली आहे.

भेटीसाठी राज्यपालांची वेळ न मागता सर्व काँग्रेस आमदारांनी थेट राजभवनात जाऊन सरकार बनविण्याचा दावा करून घॊषणाबाजी केली. भाजपच्या प्रमुखांची आज सभा होणार असल्याची माहिती मिळत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ठीक नसल्याने नेत्तृत्व बदलासाठी भाजपकडूनदेखील हालचाली सुरु झाल्या आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिकेत तटकरेंनी घेतली आमदारकीची शपथ

swarit

सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा! – नितेश राणे

Aprna

Shekhar Gore Exclusive | मला आताच आमदार झाल्यासारखं वाटतंय !

News Desk