HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

औसामध्ये युतीच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान मोदी-उद्धव ठाकरे प्रथमच एका मंचावर

मुंबई | लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापत दिसत आहे. सर्व राजकीय पक्ष त्यांच्या उमेदवारांच्या शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचार आज (९ एप्रिल) लातूर जिल्ह्यातील औसा येथे  होणार आहे.  युती झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रथमच एका व्यासपीठावर एकत्र येत असून त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

औसा येथे धाराशीव मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व लातूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ युतीची जाहीर सभा होणार आहे. युतीच्या सभेतसाठी मोदी कर्नाटकातील बिदर येथून सकाळी ९.५० वाजता सभेच्या ठिकाणी दाखल होणार आहे. ठाकरे हे मुंबई हून विशेष विमानाने अहमदनगर येथे येणार असून यानंतर हेलिकॉप्टरने औसा येथे पोहचणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मुंबईहून विशेष हेलिकॉप्टरने सभेच्या ठिकाणी पोहचणार आहेत.

 

Related posts

मोदींना पाठिंबा मात्र शिवसेनेच्या उमेदवारांना विरोध । नारायण राणे

News Desk

येडियुरप्पा-डी. शिवकुमार यांच्या भेटीने कर्नाटकात सत्ता बदलाच्या चर्चेला उधाण

News Desk

…तर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरजच पडली नसती !

News Desk