HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींनी ‘छोट्या’ भावाच्या हातात हात घालून घेतली मंचावर एन्ट्री

औसा | लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जवळपास अडीच वर्षानंतर एका मंचावर आले. लातूरमधील औसा येथे युतीच्या प्रचार सभेत मोदी आणि ठाकरे यांनी हातात हात घालून मंचावर प्रवेश केला. मोदी आणि ठाकरे यांच्या एन्ट्रीने सेना-भाजपत गेल्या साडेचार वर्षात सुरू असेलेल मतभेत निव्वळले असल्याचे चित्र दिसून आले.

मोदींनी आज (९ एप्रिल) त्यांच्या भाषणात ‘शिवसेना पक्षप्रमुख आणि धाकटे बंधू उद्धव ठाकरे’ असा उल्लेख करत केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेत, सिद्धेश्वर महाराजांचा आशीर्वाद असा उल्लेख मोदींनी सुरुवातीलाच केला. महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे, असे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितले होते.

परंतु निवडणुकीत भाजपने नेतेही राज्यभरात आम्ही मोठे भाऊ म्हणून प्रचार आहेत. अशातच आज व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना नरेंद्र भाई असा उल्लेख करुन केली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यात भाषणात माझा छोटा भाऊ म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

असंख्य नवरे बोलत असतील, बायको शिवसेनेसारखी पाहिजे !

News Desk

हल्लाबोलच्या प्रतिसादानंतर राष्ट्रवादीची राज्यभर परिवर्तन यात्रा !

News Desk

मनसेतून सेनेत आलेल्या सहा नगरसेवकांना तुर्तास दिलासा

News Desk