HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

पंतप्रधान मोदींनी राफेल, नोटबंदीसह नीरव मोदींवर माझ्याशी खुली चर्चा करावी !

नवी दिल्ली | “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल, नोटबंदी आणि नीरव मोदी या प्रकरणांवर माझ्यासोबत चर्चा खुली करण्याचे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे.” राहुल गांधी यांनी आज (९ एप्रिल) ट्विट करत या तीन मुद्यांवर पंतप्रधानांनी पूर्ण तयारीनिशी माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी यावे. परंतु मोदींना माझ्यासोबत चर्चा करण्याची भिती वाट असल्याचा खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, नरेंद्र मोदी, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून माझ्याशी चर्चा करण्यास घाबरता का? मी तुमच्यासाठी हे सोप्प करुन देतो. तुम्ही पुस्तके उघडून खालील विषयांवर चर्चेची तयारी देखील करा. पहिले -राफेल आणि अनिल अंबानी, दुसरे – नीरव मोदी आणि तिसरे अमित शहा आणि नोटाबंदी या मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आव्हान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.

राहुल गांधी यांनी भाजपने काल (८ एप्रिल)  संकल्प पत्र जाहीर केले. भाजपच्या जाहीरनाम्यावर राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले की, भाजपचा जाहीरनामा हा बंद खोलीत तयार करण्यात आलेला आहे. भाजपच्या संकल्प पत्रात दूरदृष्टीचा अभाव असून हे संकल्पपत्र अहंकाराने भरलेले आहे,’ अशी टीकास्त्र राहुल गांधी केली होती.

 

 

Related posts

नागपुमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे

News Desk

शंकरसिंग वाघेला राष्ट्रवादीत करणार प्रवेश ?

News Desk

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार यांचा खुलासा

Gauri Tilekar