HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : पंतप्रधानांनी भावनिक मुद्द्यांपेक्षा विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करावी !

मुंबई | “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने केवळ भावनिक मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करावी. मोदी केवळ मोठमोठी आश्वासने देतात. मात्र त्यांचे दोन कोटी रोजगाराचे आश्वासन कुठे गेले ? महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाचे काय झाले ? असे प्रश्न तुम्ही मोदींना विचारणे आवश्यक आहे”, असे काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. प्रियांका गांधी या आज (१२ मार्च) गांधीनगर येथे कार्यकर्त्यांना संबोधित करीत होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. “जागरूक असणे यापेक्षा मोठी देशभक्ती नाही”, असेही मोठे विधान प्रियांका गांधी यांनी यावेळी केले आहे.

काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आलेल्या प्रियांका गांधी या आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्याचे दिसत आहे. “तुमची जागरुकता या देशाला घडवणार आहे. स्वातंत्र्याची लढाई येथूनच सुरू झाली होती. आता सरकारविरुद्ध आवाज उठवण्यास देखील येथूनच सुरूवात झाली पाहिजे”, असेही प्रियंका गांधी यांनी यावेळी म्हटले आहे. देशातील घटनात्मक संस्था उध्वस्त झालेल्या असताना एकत्र येऊन देशाचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर आली आहे, असेही प्रियांका गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.

Related posts

पंतप्रधान मोदी आज वाराणसी दौ-यावर

News Desk

चिक्की पाठोपाठ आता मोबाईल घोटाळा, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप

News Desk

#LokSabhaElections2019 : महाराष्ट्रात ९६ हजार व्हीव्हीपॅट यंत्र वापरणार

News Desk