HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

पंतप्रधान मोदी एखाद्या सडकछाप माणसाप्रमाणे बोलतात, मेमन यांची जीभ घसरली

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांची जीभ घसरली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतक्या मोठ्या पदावर असून सुद्धा एखाद्या अडाणी, सडकछाप माणसाप्रमाणे बोलतात, असे मला वाटते. घटनात्मक पदासाठी रस्त्यावरून पंतप्रधान निवडला जात नाही”, असे वादग्रस्त वक्तव्य माजिद मेमन यांनी केले आहे. यावेळी माजिद मेमन यांनी नरेंद्र मोदी विरोधी पक्षावर टीका करताना भाषेची मर्यादा विसरल्याची टीकाही केली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एखाद्या अडाणी, सडकछाप माणसासारखे बोलतात, असे मला वाटते. ते एका घटनात्मक पदावर बसले आहेत. अशा पदासाठी रस्त्यावरून पंतप्रधान निवडला जात नाही. तसेच, पंतप्रधान हे थेट जनतेकडून नव्हे तर जनतेने निवडलेले खासदारांकडून निवडले जातात. यावेळीसुद्धा सर्वात मोठा पक्ष पंतप्रधानाची निवड करणार आहे.”

“जनतेला नेत्यांकडून चांगल्या वर्तनाची, चांगल्या आचरणाची अपेक्षा केली जाते. जनता अशा नेत्यांकडे एक आदर्श व्यक्ती पाहते. त्यांच्या कृतीचे आचरण करते. मात्र, सध्या नरेंद्र मोदी विरोधी पक्षावर टीका करताना भाषेची मर्यादा विसरले आहेत, आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत आहेत”, असेही माजिद मेमन यांनी म्हटले आहे.

Related posts

नगरमध्ये सुजय विखे-पाटील यांना काँग्रेसकडून जाहीर पाठिंबा

News Desk

राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याची भाजपने उडवली खिल्ली

News Desk

पंतप्रधान मोदी ‘या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक

News Desk