HW News Marathi
राजकारण

उत्तर प्रदेशात पंतप्रधान मोदी विरुद्ध योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली | देशातील राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश या तीन मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेला पराभव हा भाजपसाठी एक अत्यंत मोठा धक्का आहे. उत्तर प्रदेशमध्ये चक्क पंतप्रधान मोदी विरुद्ध योगी आदित्यनाथ अशी पोस्टर्स झळकली आहेत. या पोस्टर्समध्ये पंतप्रधान मोदींच्या फोटोखाली ‘जुमलेबाजी का नाम मोदी’ तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोखाली ‘हिंदुत्व का ब्रांड योगी’ असे लिहिण्यात आले होते. या पोस्टर्समुळे उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण प्रचंड तापल्याने पोलिसांनी ही पोस्टर्स काढून टाकली आहेत.

दरम्यान, या प्रकरणात सुमित पासी, इक्रमुद्दीन आणि मनिष अग्रवाल या तीन जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या संघटनेचा प्रमुख अमित जानी याचा या प्रकरणात सहभाग असल्याचे म्हटले जात आहे. या पाच राज्यांत योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभा घेतल्या नसत्या तर भाजपची स्थिती आणखीच वाईट झाली असती, असे अमित जानी यांनी एका व्हिडीओमार्फत म्हटले आहे. अमित जानी हे सपा नेते शिवपाल यादव यांचे निकटवर्तीय आहेत, अशीही माहिती मिळत आहे.

पंतप्रधान मोदी विरुद्ध योगी आदित्यनाथ यांचे हे पोस्टर्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला सामना कराव्या लागलेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर या स्थितीला नेमकं कोण जबाबदार ठरतं यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

EVMHacking : गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची ‘रॉ’कडून चौकशी करा !

News Desk

“सत्ता तुमच्या बुडाखाली ठेवण्याची राक्षसी महत्वकांक्षा येते, तेव्हा …,” उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

Aprna

राहुल गांधी आज घेणार काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक

News Desk
व्हिडीओ

५ राज्याच्या निवडणूक निकालावरुन मोदींनी धडा घ्यावा

News Desk

सामना संपादकीयमधून उध्दव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधलाय. हे राज्य व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांसाठी चालवले व आता ते पेंढाऱ्यांचे राज्य बनले. पाचपैकी एकाही राज्यात मोदी व शहा विजय मिळवू शकले नाहीत. कारण जनतेला व्यापारी नको आहेत, असं मत गुरुवारी सामनाच्या अग्रलखातून व्यक्त करण्यात आलंय. राहुल गांधी यांनी नम्रतेने सांगितले, ‘आम्ही भाजपचा 2019 मध्येही पराभव करू, पण भाजपमुक्त हिंदुस्थानचा नारा देणार नाही.’ इतक्या वादळातही गांधी का टिकले व इतके घाव सोसूनही लोकशाही का नष्ट झाली नाही याचे उत्तर त्याच विनम्रतेत असल्याचंही सामनामधून सांगण्यात आलं आहे.

Related posts

“Shivsena च्या राठोडांचा राजीनामा घेतला ना? मग मलिकांचा का नाही?”; Sudhir Mungantiwar यांचा सवाल

News Desk

शिवसेना-संघ राम मंदिरांच्या मुद्यांवरून भाजपला एकटे पाडणार का?

swarit

“Khotkar विधानसभेचे उमेदवार आहेत, त्यांनी लोकसभेच्या शेत्राबद्दल बोलू नये”; Raosaheb Danve

News Desk