May 24, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

पंतप्रधान मोदींची पहिलीच पत्रकार परिषद, मात्र पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीच

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ५ वर्षात प्रथमच शुक्रवारी (१७ मे) पत्रकार परिषद घेतली आहे. ‘लोकसभा निवडणूक २०१९’च्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीचा प्रचार अवधी संपताच पंतप्रधान मोदींनी त्यांच्या या कार्यकाळातील पहिली पत्रकार परिषद घेतली आहे. “देशात असे पहिल्यांदाच होणार आहे कि, आमचे सरकार दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सत्तेवर येणार आहे”, असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. भाजप अध्यक्ष अमित शाह हेच पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. “मोदींनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक नाही”, असे म्हणत अमित शाह यांनी याबाबत स्पष्टीकरण देखील दिले.

भाजपच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी मांडलेले मुद्दे
  • जगातील सर्वात मोठी लोकशाही
  • मला खात्री आहे पूर्ण बहुमताचे सरकार बनणार
  • गेल्या ५ वर्षांत मी भरीव काम केलं. अनेक चढ-उतार आले, पण प्रत्येकवेळी देशाने साथ दिली. म्हणूनच, आज मी देशातील
  • प्रत्येक नागरिकाचे आभार मानण्यासाठी इथे आलो.
  • देशात हे पहिल्यांदा होणार आहे. आमचे सरकार दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सत्तेवर येणार आहे.
  • निवडणुका, आयपीएल, परीक्षा सर्व एकत्र होत आहेत, सरकार स्थिर असेल तरच हे शक्य आहे.
  • पहिली संधी २०१४ साली मिळाली आता २०१९ साली मिळणार
  • १६ मे २०१४ रोजी निवडणुकीचा निकाल आला होता. १७, २०१४ ला आम्ही प्रामाणिकपणे कामाला सुरुवात केली
  • १७ मे, २०१४ रोजी सट्टेबाजांचे नुकसान व्हायला सुरुवात झाली

Related posts

निवडणूक प्रचाराच्या वेळी बोलण्याच्या ओघात ‘चौकीदार चोर है’ विधान

News Desk

राफेल घोटाळ्याबाबतची सर्व माहिती पर्रीकरांच्या बेडरुममध्ये, काँग्रेसचा आरोप

News Desk

राफेलवरून संसदेत गदारोळ, राहुल गांधींचा मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार

News Desk