नवी दिल्ली | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ फेब्रुवारी) लोकसभा व विधानसभा निवडणुकांपूर्वीचे शेवटचे भाषण केले. मोदी सरकारचे पाच वर्षांच्या कालावधीतील हे शेवटचे अधिवेशन आहे. या भाषणमध्ये मोदी सरकारने गेल्या साडे चार वर्षां केलेल्या प्रगतीचा पाढे वाचले. तसेच मोदी विरोधकांवर निशाणा साधत म्हणाले की, मोदींना वाईट म्हणा, भाजपाला वाईट म्हणा, पण हे करता करता देशाला वाईट म्हणू नका, असे म्हणत मोदींनी विरोधकांना टार्गेट केले. सध्याची विरोधकांची टीका म्हणजे ‘उल्टा चोर चौकीदार को डाँटे‘, असेच असल्याचे मोदींनी म्हटले.
PM Narendra Modi in Lok Sabha: Modi ki aalochna karte karte, BJP ki aalochna karte karte, desh ki buraii karne lagte hain. https://t.co/VJ6iQ84u5C
— ANI (@ANI) February 7, 2019
मोदींचे १६ लोकसभेतील हे शेवटचे भाषण होते. या मोदींनी या भाषणा दरम्यान विरोधकांवर आरोपाच्या फैऱ्या झाडल्या आहेत. मोदींनी म्हटेल की,”माझा एका गरीब कुटुंबात जन्म झाला यात माझे काय चुकले, या व्यक्तीने सुल्तानचा आव्हान दिले. काँग्रेस सत्ता आपला हक्क असल्याचे मानते. तर ५५ वर्षांवर आमचे ५५ महिने भारी आहेत. साडे चार वर्षात १० कोटी शौचालय बांधले, ५५ महिन्यात ५० टक्के बँक खाती, वीज कनेक्शन, गॅस कनेक्शन मोठ्या प्रमाणात पोहोचविण्याच काम केल्याचंही मोदींनी सांगितले.”
PM Narendra Modi in Lok Sabha: Gas connections in their 55 years of rule were 12 crore, it is 13 crore in our 55 months. We have worked at much faster speed in our five years https://t.co/umOuvFdu8Y
— ANI (@ANI) February 7, 2019
तसेच काँग्रेस निवडणूक आयोगाचा वेळोवेळी अपमान केला आहे. महाभियोगच्या नावाखाली काँग्रेसने भिती घालण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने निवडून आलेले सरकार बरखास्त करण्याचे काम केले, तसेच काँग्रेसला संस्थांच्या मानापमानाच्या बाता करण्याचा हक्क नाही. कारण मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय पत्रकार परिषदेत फाडण्याचे काम त्यांनी केल्याचे मोदी म्हणाले. तसेच काँग्रेसने लष्कराचाही अपमान केल्याचे ते म्हणाले. महागठबंधन म्हणजे महामिलावट असल्याचा टोलाही मोदींनी लगावला.
PM Narendra Modi in Lok Sabha: People have seen the work a Government with an absolute majority can do. They have seen our work. They do not want a 'Mahamilavat' Government of those who recently gathered in Kolkata pic.twitter.com/OfdVaCOSLm
— ANI (@ANI) February 7, 2019
काही वर्षापूर्वी भारताची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. इंटरनेट डेटा सर्वात स्वस्त अन् वापर जगभरात सर्वाधिक प्रमाणात भारतात होत असल्याचेही मोदींनी सांगितले. तसेच साडे चार वर्षात १० कोटी शौचालय बांधले, ५५ महिन्यात ५० टक्के बँक खाती, वीज कनेक्शन, गॅस कनेक्शन मोठ्या प्रमाणात पोहोचविण्याच काम केल्याच्ही मोदींनी सांगितले. दरम्यान, महागठबंधन म्हणजे ‘महामिलावट’ असल्याचा आरोपही मोदींनी केला
PM in Lok Sbaha: In last 4 1/2 years India became 6th largest economy from the 10-11th largest.When we reached 11th position then people, who cannot even be seen in opposition now, praised themselves.They felt proud on reaching 11th, why are they saddened when we have reached 6th pic.twitter.com/NNeCsuXohP
— ANI (@ANI) February 7, 2019
तसेच देशाची अर्थव्यवस्था आज जगात ६ व्या क्रमांकावर आहे. काही वर्षापूर्वी भारताची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. इंटरनेट डेटा सर्वात स्वस्त अन् वापर जगभरात सर्वाधिक प्रमाणात भारतात होत असल्याचेही मोदींनी सांगितले. तसेच साडे चार वर्षात केलेल्या कामांचाही उल्लेक यावेळी मोदींनी केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.