मुंबई | विविध विकास कामांच्या भूमिपूजन तसेच उद्घाटन कार्यक्रमांसाठी आज (९ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याला सुरुवात झाली आहे. सोलापुरातील पार्क चौकातील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींची सभा सुरु आहे. यावेळी जनतेला संबोधित करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पंतप्रधान मोदींच्या या सभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल के. विद्यासागरराव आणि अन्य नेतेमंडळी देखील उपस्थित आहेत.
I look forward to visiting Solapur tomorrow in connection with following development works:
Dedication of four-laning of Solapur-Osmanabad section of NH-211.
Foundation Stone of 30,000 houses under PMAY.
Launch of underground Sewerage System, and three Sewage Treatment Plants.— Narendra Modi (@narendramodi) January 8, 2019
कोणकोणत्या विकास कामांचे होणार उदघाटन ?
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत झालेल्या विकास कामांच्या उदघाटनासह केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने कुंभारी येथे तब्बल ३० हजार असंघटित कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांची पायाभरणी, उजनी धरण ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे भूमिपूजन, सोलापूर-उस्मानाबाद-येडशी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.