HW News Marathi
राजकारण

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींच्या ९ सभा

मुंबई। आगामी विधानसभा निवडणुक अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल्यानंतर सर्वच पक्षाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर आणि सर्व पक्षांचे जवळपास सर्वच उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचारासाठी आता खुद्द पंतप्रधान मोदी संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल ९ सभा घेणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुक देखील पार पडणार आहे. विशेष म्हणजे याच पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी राज्यातील आपली पहिली सभा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीकरिता उभ्या राहिलेल्या उदयनराजे भोसले यांच्यासाठी घेणार आहेत. आगामी विधानसभेकरिता पंतप्रधान मोदी ९ तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १८ सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

पंतप्रधान मोदी निवडणुकांदरम्यान विशेषतः महाराष्ट्रात हे स्वतः लक्ष घालताना दिसत आहे. लोकसभेकरिता देखील मोदींनी महाराष्ट्रात अनेक सभा घेत, जनतेशी संवाद साधत प्रचार केला होता. तर आता विधानसभेकरिता देखील स्वतः पंतप्रधान मोदी ९ सभा घेणार आहेत. मोदींच्या या ९ सभांपैकी २ सभा पश्चिम महाराष्ट्रात होणार असून त्यापैकी पहिली सभा साताऱ्यात तर दुसरी सभा पुण्यात होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहा… भाजप आमदार-खासदारांच्या गुणवत्ता चाचणीचा निकाल

News Desk

सत्ताधाऱ्यारी-विरोधकांमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Aprna

आचरेकरांवर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार का केले नाहीत !

News Desk