नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकांमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक राजकीय पक्षांतील नेते सध्या एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहेत. आता काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी देखील पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली आहे. “मी माझ्या उभ्या आयुष्यात इतका भित्रा आणि कमकुवत पंतप्रधान पाहिला नाही”, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. “केवळ प्रचारसभांमध्ये मोठमोठी विधाने केल्याने राजकीय शक्ती वाढत नाही”, असाही टोला प्रियांका यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथील रॅलीदरम्यान उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. “केवळ प्रचारसभांमध्ये मोठंमोठी विधाने केली म्हणजे राजकीय शक्ती वाढत नाही. जनतेचे प्रश्न ऐकण्याची ते प्रश्न सोडवण्याची, त्यांच्या टीका झेलण्याची, विरोधकांची विधाने ऐकून घेण्याची शक्ती ही खरी राजकीय शक्ती असते. परंतु, पंतप्रधान मोदी जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणे योग्य समजत नाहीत”, असेही प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या. यावेळी आपण आपल्या उभ्या आयुष्यात मोदींइतका भित्रा, कमकुवत पंतप्रधान पहिला नसल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.