HW Marathi
राजकारण

प्रियांका गांधी आजपासून उत्तर प्रदेश दौऱ्यावर

नवी दिल्ली | काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी आज (११ फेब्रुवारी) राज्याच्या दौ-यावर असणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसचे पश्चिम उत्तर प्रदेशचे महासचिव ज्योतिरादित्य सिंह देखील असतील. त्यानिमित्ताने येथे भव्य रोड-शोचे देखील आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने प्रियांका गांधींचा राज्याचा हा पहिलाच दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

“प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य सिंह हे लखनौ येथील काँग्रेस मुख्यालयात जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करतील. राहुल गांधी हे आजच दिल्लीला परतणार असल्याची शक्यता असून प्रियंका गांधी ४ दिवस या दौऱ्यावर असणार आहेत. १२ ते १४ फेब्रुवारी या दरम्यान प्रियंका गांधी व ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस मुख्यालयात कार्यकर्त्यांना भेटतील”, अशी माहिती काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे.

Related posts

राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याची भाजपने उडवली खिल्ली

News Desk

राम मंदिर प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेसचा हस्तक्षेप !

News Desk

#LokSabhaElections2019 : अखेर रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk