नवी दिल्ली |पुणे पोलिसांनी मंगळवारी कोरेगाव-भीमा हिंसाचारासंबंधी देशामधील वेगवेगळ्या शहरात छापेमारीला सुरुवात केली आहे. या कारवाईदरम्यान बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यावेळी करण्यात आलेल्या या कारवाईवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. तसेच आरएसएसवर ट्विटरच्या माध्यमातून चांगलेच तोंडसुख घेतल्याचे पहायला मिळत आहे.
भाजपाच्या काळात देशात एकच सामाजिक संस्था राहु शकते जीचे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. बाकी सर्व सामाजिक संस्था बंद करा. बाकी सर्व समाजसेवकांना जेल मध्ये टाका. जे तक्रार करतात त्यांना गोळ्या घाला. नवीन भारतमध्ये आपले स्वागत आहे. # भीमाकोरेगांव आशा आशयाचे ट्विट करत पुन्हा एकदा राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोंडसुख घेतला आहे.
There is only place for one NGO in India and it's called the RSS. Shut down all other NGOs. Jail all activists and shoot those that complain.
Welcome to the new India. #BhimaKoregaon
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 28, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.