नवी दिल्ली | “काँग्रेसने भारताच्या विकासाची गाथा रचली. परंतु नरेंद्र मोदींनी नोटबंदी आणि गब्बर सिंह टॅक्स आणून त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केले. पंतप्रधान मोदी हे बिनकामाचे व्यक्ती आहेत जे कुणाचेही ऐकत नाहीत”, अशी टीका करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे.
Congress built the India growth story. Modi has used Demonetisation and the Gabbar Singh Tax to completely destroy it. He’s an incompetent man who listens to nobody.https://t.co/mAo8yWa1gV
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 5, 2019
“काँग्रेसने देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मात्र पंतप्रधान मोदींनी नोटबंदी आणि जीएसटी आणून देशाला उद्ध्वस्त केले”, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे. येत्या काळात मोदी सरकारचे सर्वात मोठे निर्णय मानले जाणारे नोटाबंदी आणि जीएसटी हे त्यांचे सर्वात मोठे अपयश म्हणून समोर येईल. या मागची नेमकी कारण सांगणारी एका इंग्रजी वृत्तपत्राची बातमी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर करत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.