HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

राहुल गांधींकडे १५ कोटींची संपत्ती, ७२ लाख रुपयांचे कर्ज, प्रतिज्ञापत्रातील माहिती

नवी दिल्ली |  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल (४ एप्रिल) केरळच्या वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरतांना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये राहुल गांधी यांच्या नावे एकूण १५.८८ कोटींची संपत्ती आहे. २०१४ मध्ये राहुल गांधी यांच्याकडे ९.४ कोटींची संपत्ती होती. गेल्या पाच वर्षात राहुल गांधी यांच्या संपत्तीत जवळपास ६.४८ कोटींची वाढ झालेली पाहायला मिळते. तसेच राहुल गांधी यांची आई सोनिया गांधी यांच्याकडे ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.

राहुल गांधी यांच्याकडे ५ कोटी ५० लाख ५८ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर स्थावर मालमत्तेची किंमत १० कोटी ८ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. अशातरेने राहुल गांधी यांच्याकडे एकूण १५ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता आहे. राहुल गांधी यांच्याकडे फक्त ४० हजार रुपये रोख रक्कम आहे. १७ लाख ९३ हजार रुपयांची बँक डिपॉझिट आहे. यंग इंडियनचे एकूण १९०० शेअर्स त्यांच्याकडे आहेत, ज्याची किंमत १९ लाख रुपये आहे. पीपीएफमध्ये ३९ लाख ८९ हजार रुपये आहेत. याशिवाय ३३३.३० ग्रॅम सोने आहे. या सोन्यांची किंमत जवळपास २ लाख ९१ हजार रुपयेऐवढी आहे. तर म्युचुअल फंडमध्ये एकूण ५ कोटी १९ लाख रुपये आहेत. अशी एकूण ५ कोटी ८० लाखांची जंगम मालमत्ता राहुल गांधीकडे आहे.

महरोलीच्या सुल्तानपूरमध्ये प्रियांका गांधी वाड्रा आणि राहुल गांधी यांच्या नावे संयुक्तरित्या १ कोटी ३२ लाखांची जमीन आहे. गुरुग्राममध्ये सिग्नेचर टॉवर बीमध्ये व्यावसायिक इमारत आहे, ज्याची किंमत जवळपास ८ कोटी ७५ लाख रुपये आहे. अशी एकूण १० कोटी ८ लाखांची स्थावर मालमत्ता राहुल गांधींकडे आहे. राहुल गाधींनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्या नावे एकही गाडी नाही. तसेच त्यांच्या नावे ७२ लाख रुपयांचे कर्ज आहे. lत्यातील ५ लाख रुपयांचे लोन त्यांनी आई सोनिया गांधी यांच्याकडूनही घेतले आहे.

Related posts

सगळ्यांनाच पक्षात घ्यायला आमच्याकडे मात्र ‘वॉशिंग मशीन’ नाही !

News Desk

राज्यच्या अर्थसंकल्पात ‘या’ महत्त्वाच्या तरतूद

News Desk

आनंदाची बातमी! पुण्यात ५४८ जणांना डिस्चार्ज

rasika shinde