HW News Marathi
राजकारण

गुगलवर राहुल गांधी सरस, अमित शहांना टाकले मागे

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुगलवर राहुल गांधी यांना भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आले आहे. दुसरीकडे भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांचा विचार करता काँग्रेसहून अधिक भाजपला सर्च करण्यात आले आहे. गुगल ट्रेंड्सनुसार, ११ डिसेंबर २०१७ ते ११ डिसेंबर २०१८ या वर्षभराच्या कालावधीत राहुल गांधी यांच्या नावाचे सरासरी सर्चिंग २६ पॉईंट्स एवढे असून भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या नावाचे सरासरी सर्चिंग केवळ ६ पॉईंट्स एवढेच आहे.

गुगल ट्रेंड्सनुसार, राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या आठवड्याभरापूर्वी त्यांना गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आले होते. १० डिसेंबर ते १६ डिसेंबर २०१७ या कालावधीत राहुल गांधी यांचे सरासरी सर्चिंग ४३ पॉईंट्स तर अमित शाह यांचे सरासरी सर्चिंग ५ पॉईंट्स एवढे होते. मे महिन्यात अमित शाह आणि राहुल गांधी या दोघांच्याही सर्चिंग पॉईंट्समध्ये वाढ झाली होती. कारण, मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निर्णय जाहीर झाले होते.

त्यानंतर जुलै महिन्यात राहुल गांधी यांना सर्वात जास्त सर्च केले गेले. १५ ते २१ जुलै २०१८ दरम्यान राहुल गांधींना ६६ पॉईंट्स मिळाले होते. याच दरम्यान राहुल गांधींनी भर सभागृहात पंतप्रधान मोदींना मिठी मारली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार निवडणूक लढविणार नाही | शरद पवार

News Desk

भाजपच्या पराभवासाठी शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात

News Desk

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk