नवी दिल्ली | राफेल करारात कोणतीही अनियमितता नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी सर्व याचिका फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने भाजप सरकारला मोठा दिलासा मिळाला असून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, “राफेलसंदर्भात राहुल गांधींनी देशाची दिशाभूल केली असल्याचा आरोप करत राहुल गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागावी”, अशी मागणी संसदीय कार्यमंत्री थावर चंद गहलोत यांनी केली आहे. यावेळी भाजपच्या खासदारांनी आक्रमक होत सभागृहात घोषणा देण्यास सुरुवात केल्यामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करण्याची वेळ आली.
HM Rajnath Singh in Lok Sabha: Congress President tried to mislead public for political benefit, and maligned Indian image globally, he should apologize to the house and to the people of the country. He thought 'Hum to doobe hain sanam tum ko bhi le doobenge' #RafaleDeal pic.twitter.com/R35swDE9GR
— ANI (@ANI) December 14, 2018
राफेल विमान खरेदी प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही, असे स्पष्ट करत केंद्र सरकार खरेदी करत असलेल्या १२६ विमान खरेदी प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राफेल करारा संदर्भात प्रत्येक लहान लहान गोष्टींची पडताळणी करणे न्यायालयाला शक्य नाही, असेही सर्वोच्च न्यायालायने स्पष्ट केले आहे.
Uproar in Lok Sabha over #RafaleVerdict by Supreme Court
— ANI (@ANI) December 14, 2018
राफेल विमान कराराला विरोध करत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसह कॉंग्रेस पक्षाने मोदी सरकारला वेठीस धरले होते. यूपीए सरकारपेक्षा तिप्पट किंमत देऊन भाजपने राफेल करार केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. रिलायन्स कंपनीला विमान निर्मिती क्षेत्राचा कोणताही अनुभव नसताना त्यांना राफेलचे कंत्राट दिल्याने राहुल गांधीकडून भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर राफेल कराराच्या खरेदीची संपूर्ण चौकशी झाली तर पंतप्रधान मोदींना तुरुंगात जावे लागेल, असेही काँग्रेसकडून सांगण्यात येत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप देखील राहुल गांधींनी म्हटले होते.
Home Minister Rajnath Singh on SC dismisses petition seeking Court probe in #Rafale deal: The matter was crystal clear from the beginning and we have been saying that the allegations leveled by Congress were baseless and to gain political mileage. pic.twitter.com/G1Nfsv64j6
— ANI (@ANI) December 14, 2018
राफेल विमान खरेदी करार हा सुरुवातीपासूनच अत्यंत सरळ आणि स्पष्ट होता. राफेलबाबत काँग्रेसने केलेले सर्व आरोप हे निराधार आणि केवळ राजकीय हेतू सध्या करण्यासाठी होते हे आम्ही आधीपासूनच सांगत होते, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.