HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

राहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायनाडमधून लढविणार आगामी लोकसभा निवडणूक

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे २ मतदारसंघातून लढणार आहेत. उत्तर प्रदेशमधील अमेठीसह केरळमधील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची अधिकृत माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे. लोकसभेची फेररचना झाल्यानंतर २००८ सालपासून वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. २००८ सालपासून काँग्रेसचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे. त्यामुळे केरळ काँग्रेस कमिटीकडून राहुल यांनी वायनाडमधून निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर आज राहुल गांधी अमेठीसह वायनाडमधून देखील निवडणूक लढवतील अशी अधिकृत घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

News Desk

‘नो पार्किंग’ प्रकरणानंतर महापौरांना मुंबई ट्रॅफीक पोलिसांकडून ई-चलन

News Desk

मागासवर्ग आयोगाच्या अहवालातल्या शिफारशी अजूनही अस्पष्ट !

News Desk