दिल्ली | कश्मीर मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी सीबीआयने केलेली अटक या दोन्ही प्रकरणांची सांगड घालत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे.
उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात पिडीत तरुणीने भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्यांच्या भावाने जून २०१७ मध्ये बलात्कार केल्याचा आरोप केला असून न्याय मिळावा म्हणून पीडित तरुणीच्या कुटुंबियांनीउत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीच्या वडिलांना यावेळी पोलिसांनी अटक केली. परंतु पोलीस कोठडीत पीडित तरुणीच्या वडिलांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे खळबळ माजली.
या दोन्ही प्रकरणावर बेटी बचाव बेटी पढाव ची मोहीम चालवणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच का बोलत नाहीत अशा आशयाचे ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदींवर टिका केली आहे. पंतप्रधान मोदी अशा प्रकारे तुम्ही शांत रहाणे अनपेक्षित आहे. महिला व मुलांवरील वाढत्या हिंसाचाराबद्दल तुम्हाला काय वाटते? बलात्कारी आणि खूणी लोकांना राज्यात संरक्षण कसे मिळते ? असे दोन प्रश्न विचारत भारत तुमच्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहे असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. तर या ट्विटला ट्विटरवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. #SpeakUp असा हॅश टॅग वापरत सध्या लोक या ट्विट वर आपला निषेध व्यक्त करत आहेत.
Mr Prime Minister, your silence is unacceptable.
1. What do YOU think about the growing violence against women & children?
2. Why are accused rapists and murderers protected by the state?
India is waiting.#SpeakUp
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 13, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.