HW News Marathi
राजकारण

गोव्यात राहुल गांधींनी घेतली पर्रीकरांची भेट, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी (२९ जानेवारी) पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पाच्या ठिकाणी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी पर्रीकरांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. दरम्यान, राहुल गांधींनी अशा प्रकारे अचानक पर्रीकरांची भेट घेणे थोडे आश्चर्यजनक असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. गेल्या शनिवारपासूनच राहुल गांधी सोनिया गांधी यांच्यासह खासगी भेटीवर गोव्यात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, राहुल गांधींनी याआधी कधीच गोव्याच्या विधानसभा प्रकल्पाला भेट दिली नव्हती.

नेमके काय घडले ?

गोवा विधानसभेच्या अधिवेशनात मंगळवारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या अभिभाषणानंतर कामकाज थांबले. त्यावेळी मुख्यमंत्री पर्रीकर विधानसभा प्रकल्पातील स्वत:च्या केबिनमध्ये गेले असता राहुल गांधी कडक सुरक्षा व्यवस्थेसह तेथे दाखल झाले. तेथे येऊन त्यांनी पर्रीकरांच्या तब्येतीची चौकशी केली. विशेष म्हणजे यावेळी राहुल गांधी हे विधानसभा प्रकल्पाच्या मुख्य नव्हे तर मागील दाराने आत आले. तसेच यावेळी राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी आणि पर्रीकर यांची भेट केवळ ५ मिनिटे होती. “तुम्ही इतके आजारी असूनही कसे काय काम करता”, असा प्रश्न राहुल गांधी यांनी यावेळी विचारला. “माझा स्वभावच तसा आहे. त्यानुसारच मी काम करतो”, असे उत्तर पर्रीकर यांनी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : पार्थ, सुजयच्या पाठोपाठ आता आदित्य ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात ?

News Desk

‘तुमचा पीएम आमचा सीएम’ हे मुंगेरीलालच्या हसीन स्वप्नासारखेच | मलिक

News Desk

मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडियासह जीएसएसटींचे काय झाले याबद्दल मोदी बोलण्यास तयार नाही !

News Desk