HW Marathi
राजकारण

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत अन् राहतील !

नवी दिल्ली | “राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील”, असा विश्वास काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाच्या कोअर ग्रुपच्या बैठकीत व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत ठेवला होता. राहुल गांधी यांचा राजीनामान्याचा हा प्रस्ताव समितीच्या सदस्यांकडून एकमताने फेटाळण्यात आला. मात्र, त्यानंतर राहुल गांधी हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती मिळत होती. याच पार्श्वभूमीवर सुरजेवाला यांनी हे वक्तव्य केले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

#MarathaReservation : ही श्रेय घेण्याची वेळ नाही !

News Desk

माझा पक्ष रजिस्टर असूनही आम्ही भाजपच्या चिन्हावर का लढायचे ?

News Desk

भैय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्याच विश्वासू सेवकाला अटक

News Desk