नवी दिल्ली | कलम ३७० हटवल्यानंर पहिल्यादांच काँग्रेस नेते राहुल गांधी हे शनिवारी (२४ ऑगस्ट) जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. राहुल गांधी यांच्यासोबत विरोधी पक्षातील ९ नेतेही असणार आहे. राहुल गांधी काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जाणार आहे. परंतु राहुल यांना विरोधी पक्ष नेत्यांसह श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आले आणि तेथूनच परत दिल्लीला पाठवण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत आलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या शिष्टमंडळाला माघारी पाठवण्यात आले.
Rahul Gandhi: Some days ago I was invited by Governor to visit J&K.I accepted the invitation. We wanted to get a sense of what ppl are going through, but we weren't allowed beyond the airport. Press ppl with us were mishandled,beaten. It's clear that situation in J&K isn't normal pic.twitter.com/1XKyaUcg06
— ANI (@ANI) August 24, 2019
केंद्राने कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचे विधान राहुल गांधी यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे लक्ष द्यावे, असा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला होता. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीर दौऱ्यावर येण्याबाबत निमंत्रण दिले. राहुल यांनी पहिल्यांदा काश्मीरमध्ये येऊन आढावा घ्यावा, त्यानंतर भाष्य करावे. काश्मीर दौऱ्यावर येण्यासाठी त्यांना विमान पाठवतो, असा टोमणा सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधीना लगावला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.