HW News Marathi
राजकारण

राहुल गांधींच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला ?

भोपाळ । मध्य प्रदेशमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि त्यांचा मुलगा कार्तिकेय यांच्यावर निशाणा साधला होता. “पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे नाव पनामा पेपर्समध्ये आल्यानंतर पाकिस्तानसारख्या देशानेही कारवाई करत त्यांना कारागृहात पाठवले. मात्र शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्समध्ये येऊनही त्यांच्याविरोधात कोणती कारवाई केली गेली नाही,” अशी टीका राहुल गांधींनी केली होती. त्यामुळे आता शिवराज सिंह चौहान हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची शक्यता आहे.

मध्यरात्री ट्विट करून आपण राहुल गांधी यांच्याविरोधात आज (मंगळवारी) अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे चौहान यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी कोणताही संबंध नसताना राजकीय भाषणात त्यांच्या मुलगा कार्तिकेयच्या नावाची बदनामी केल्यामुळे शिवराज सिंह चौहान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आज राहुल गांधींनी सर्व सीमा पार केल्या आहेत

‘गेली अनेक वर्षे काँग्रेस माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर आरोप करीत आहे. परंतु, आम्ही सर्वांचा मान ठेऊन मर्यादा पाळतो. मात्र आज राहुल गांधींनी सर्व सीमाच पार केल्या आहेत. याबाबत आम्ही अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत.’ असे चौहान म्हणाले

राहुल गांधी यांचे विधान खोटे

दरम्यान, कार्तिकेय चौहान यांनी देखील या प्रकरणी ट्विट केले आहे. “पनामा पेपर्समध्ये माझे नाव आल्याचे राहुल गांधी यांचे विधान खोटे आहे. सार्वजनिक व्यासपीठावरुन माझी आणि माझ्या कुटुंबीयांची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे. यामुळे मी दुःखी आहे. ४८ तासांच्या आत जर राहुल यांनी माफी मागितली नाही तर याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करेन,” असे कार्तिकेय यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे, मुनगंटीवार भेट तुर्तास रद्द

News Desk

चिंताजनक ! राज्यात एकाच दिवसात कोरोनाचे १२ नवे रुग्ण

News Desk

पक्ष सोडून जाणाऱ्यांबद्दल शरद पवार म्हणतात…!

News Desk