HW News Marathi
राजकारण

राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचे अमेठीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे यावेळी अमेठीतील अपक्ष उमेदवार ध्रुवलाल कौशल यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावरील घेतलेला आक्षेप देखील फेटाळण्यात आला आहे. “राहुल गांधी हे नक्की भारतीय नागरिक आहेत की ब्रिटिश नागरिक आहेत ?”, असा सवाल देखील भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारला होता. “२०१४ साली राहुल गांधी यांनी स्वत:ला ब्रिटिश नागरिक म्हणवून घेतले होते. आता राहुल गांधी यांनी स्वतःच सांगावे कि ते भारतीय नागरिक आहेत कि ब्रिटिश नागरिक आहेत”, असे म्हणत भाजपने थेट राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर शंका उपस्थित केली होती.

अमेठी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुवलाल कौशल यांनी राहुल यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. राहुल गांधी यांचे खरे नाव राऊल विंची असून त्यांनी फसवी कागदपत्रे सादर करून निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप ध्रुवलाल कौशल यांच्या वकीलांनी केला होता. राहुल हे भारतीय नागरिक आहेत किंवा नाही हे स्पष्ट करण्यासाठी राहुल गांधी यांच्या वकिलांनी निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय! – मुख्यमंत्री

Aprna

हिंदुस्थानातील विषमतेचे भयाण वास्तव ‘ऑक्सफॅम’च्या अहवालाने जगजाहीर !

News Desk

१९ सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Aprna