HW News Marathi
राजकारण

राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या मुलाखतीचा मुहूर्त ठरला

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बहुचर्चित मुलाखतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ही मुलाखत पुण्यातील बी.एम.सी.सी. महाविद्यालयात २१ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता होणार आहे. ‘अभूतपूर्व मुलाखत’, ‘मुक्त संवाद दोन पिढ्यांचा’ अशा पद्धतीने या कार्यक्रमाची जाहीरात करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून सर्वजण या मुलाखतीची प्रतिक्षा करत होते. याआधी ही मुलाखत ३ जानेवारीला होणार होती. पण, भिमा-कोरेगाव हिंसाचारामुळे ही मुलाखत रद्द करण्यात आली.

या प्रकट मुलाखतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर मुलाखतीची जाहीरात केली आहे. पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला ५० वर्षेपूर्ण झाले आहेत. हे दोन्ही दिग्गज नेतेमंडळी खास शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. रोखठोक स्वभावामुळे प्रसिद्ध असलेल्या राज ठाकरे यांच्या प्रश्नांवर शरद पवार कशा पद्धतीने उत्तर देणार हे पाहण्यासारखे असेल. विख्यात हास्यकवी रामदास फुटाणे यांनी या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला जलील अनुपस्थित

News Desk

महाराज…मठात जाऊन बसा, राजकारण तुमचे काम नाही !

News Desk

मध्य प्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये कोण ?

News Desk