HW News Marathi
राजकारण

नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी घेतला भाजप सरकारचा समाचार

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आजच्या नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या व्यंगचित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यंगस्नानाच्या परंपरेप्रमाणे आंघोळीसाठी आधी पाटावर बसून अंगाला तेल लावून घेत बसलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर लोकांची तोबा गर्दी जमलेली दाखवण्यात आली आहे. एकजण मुख्यमंत्र्यांच्या कानात येऊन सांगतो की, “साहेब… अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ‘धुवायला’ आलाय, पाठवू का ?”

राज्याच्या मुख्यमंत्रांसह राज ठाकरे यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी कारेट फोडण्याची प्रथा आहे. याच प्रथेचा संदर्भ घेऊन राज ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर खोचक टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“निष्ठावान कलातपस्वी हरपला”; विक्रम गोखलेंच्या निधनानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

Chetan Kirdat

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार यांचा खुलासा

Gauri Tilekar

गांधीजींच्या हत्येचे समर्थन करण्याचा प्रश्चच येत नाही, अनंतकुमार हेगडेंचा घुमजाव

News Desk