मुंबई | कोहिनूर मिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल साडेआठ तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालयातून (ईडी) बाहेर आले आहे. राज ठाकरे आज (२२ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहे. राज ठाकरे कुटुंबासह कृष्णकुंजच्या दिशेने रावान झाले आहे. या कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलीस मनसे कार्यकर्त्यांना कलम १४९ नोटीस पाठविली होती. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी देखील कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
राज ठाकरे आज सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यलयात जाणार आहेत. यामुळे मुंबई पोलीसांनी कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न राहण्यासाठी नोटीस बजाविल्या आहेत.
Live Updates
- साडेआठ तासांच्या चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडीच्या कार्यालयातून बाहेर
- राज ठाकरेंना ईडी चौकशीसाठी उद्या बोलविणार नाही
- थोड्याच वेळेत राज ठाकरे ईडी कार्यालयातून बाहेर येणार
- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गेल्या सहा तासांपासून ईडीकडून चौकशी सुरूच आहे.
- राज ठाकरे यांची २ तासापासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे
- राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सुरू
- पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, पुत्र अमित, सून मिताली ग्रँड हॉटेलमध्ये उपस्थिती आहेत
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोहिनू मिल प्रकरणी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत.
Mumbai: Maharashtra Navnirman Sena (MNS) Chief Raj Thackeray arrives at office of the Enforcement Directorate, to appear before it, in connection with a case pertaining to alleged irregularities related to Infrastructure Leasing and Financial Services (IL&FS)loan to Kohinoor CTNL pic.twitter.com/VfgINaQwLD
— ANI (@ANI) August 22, 2019
- राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला?, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानियांनी ट्वीट करत विचारत त्यांच्यावर टीका केली आहे.
राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा drama? का सहनुभी गोळा करण्याचा हा प्रयत्न
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 22, 2019
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडी चौकशीसाठी रवाना, पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, पुत्र अमित, सून मिताली ईडी कार्यालयाच्या दिशेने रवाना
- राज ठाकरे चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाण्यास त्यांच्या निवासस्थानाहून रवाना
#Mumbai: Maharashtra Navnirman Sena (MNS) Chief Raj Thackeray has been summoned by the Enforcement Directorate to appear before the agency, today. pic.twitter.com/Q7taHe21ZJ
— ANI (@ANI) August 22, 2019
- राज ठाकरेंची पत्नी शर्मीला ठाकरे आणि चिरंजीव अमित ठाकरे ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले
- मरीन ड्राइव, आझाद मैदान आणि दादर या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव संचार बंदी लागू करण्यात आली आहे
Mumbai Police: Section 144 of the Code of Criminal Procedure (CrPC) imposed in areas under Marine Drive, MRA Marg, Dadar, and Azad Maidan police stations. pic.twitter.com/DQWWzK2BgT
— ANI (@ANI) August 22, 2019
- राज ठाकरे सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार
- मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांना कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात
Mumbai: Maharashtra NavNirman Sena (MNS) leader Sandeep Deshpande detained by police as a precautionary measure. MNS chief Raj Thackeray has been summoned by the Enforcement Directorate (ED) to appear before the agency, today. pic.twitter.com/4kIUATA6PK
— ANI (@ANI) August 22, 2019
- कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त, कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त
Mumbai: Security tightened outside Enforcement Directorate's office; Maharashtra Navnirman Sena (MNS) Chief Raj Thackeray has been summoned by ED to appear before the agency, today. pic.twitter.com/rrkRijZ2dI
— ANI (@ANI) August 22, 2019
- कार्यकर्त्यांनो, कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका, राज ठाकरेंनी केली मनसे कार्यकर्त्यांना आवाहन
- राज ठाकरे आज कोहिनूर मिल प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) जाणार ईडीच्या चौकशीला सामोरे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.