HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

राजेंद्र गावित यांचा भाजपमधून शिवसेनेत प्रवेश, पालघरमधून उमेदवारी

मुंबई | पालघरचे भाजपचे विद्यमान उमेदवार खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमधून आज (२६ मार्च) शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालघरमधून राजेंद्र गावित यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. गावित त्यांच्या समर्थकांसह मातोश्रीवर भेट घेऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पुन्हा स्वगृही परतले होते. पालघर लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत माजी खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना विधासभेचे आश्वासन देण्यात आले आहे.

शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर पालघरची जागा सेनेच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे शिवसेना पुन्हा श्रीनिवास वनगांना उमेदवारी देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु वनगा यांना यामुळे खासदार गावित यांच्या हाती उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले आहे. वनगा यांना संसदेत पाठवण्याचा माझा शब्द कायम आहे. वनगा यांना आमदार व्हायचे आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थिती विधानसभेत पाठवण्यात येईल, असेही उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे.

 

Related posts

#RamMandir :अवघ्या २४ तासात उद्धव ठाकरे मुंबईला रिटर्न

News Desk

भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी खडसेंना दिलासा

News Desk

खा.शरदचंद्रजी पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांचा जल्लोष.

News Desk