HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री आले आणि बघुन गेले, राजू शेट्टींनी व्यक्त केली नाराजी

सोलापूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (१९ ऑक्टोबर) सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. गेले अनेक दिवस भाजप मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत यावरुन टीका करत होते. तर आज पाहण करण्यासाठी घराबाहेर आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री आले आणि बघुन गेले. मुख्यमंत्र्यांनी ज्यांचं सर्वाधिक नुकसान झालं, किमान त्यांना तातडीने सानुग्रह अनुदान जाहीर करायला हवं होतं. शेतकऱ्यांनी माझ्याकडे नाराजी व्यक्त केली आहे, असेही राजू शेट्टींनी सांगितले आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे तर नुकसान झालेच, पण तांत्रिक चुकादेखील झाल्या आहेत. हे नुकसान टाळता आलं असतं. आठ दिवसांपूर्वी अतिवृष्टीचा इशारा दिला होता, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनंतरही उजनीतून पाणी सोडलं नाही. सोलापूरचा जलसंपदा विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग कोलमडून पडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचाही बेजबाबदारपणा कारणीभूत आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी पंचनामा केल्यानंतर मदत जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मीटू’ मोहिमेच्या तक्रारीनंतर लवकरच कायदेतज्ज्ञाची समिती

swarit

काँग्रेसने शेतकऱ्यांना बरबाद केले, पंतप्रधान मोदींची जहरी टीका

News Desk

सरकार बोलण्यात ऑनलाईन,कामात ऑफलाईन!: खा. अशोक चव्हाण

swarit