HW News Marathi
राजकारण

धैर्यशील मानेंनी घेतला राजू शेट्टींच्या मातोश्रींचा आशीर्वाद

कोल्हापूर | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला अत्यंत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. महाराष्ट्रात देखील आघाडीला अनपेक्षित पराभव सहन करावा लागला. याच पार्श्वभूमीवर हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा पराभव केला. विजयी खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन राजू शेट्टी यांची भेट घेतली. तसेच राजू शेट्टी यांच्या मातोश्रींचे आशीर्वादही घेतले.

धैर्यशील माने यांनी गेली १० वर्षे खासदार राहिलेल्या राजू शेट्टी यांचा पराभव करून हातकणंगले मतदारसंघात विजय मिळवला आहे. धैर्यशील माने यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन थेट राजू शेट्टी यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. राजू शेट्टी यांच्या आईने धैर्यशील माने यांचे औक्षण केले अन् “मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, तुमचा आशीर्वाद राहू दे. सर्वकाही चांगलं होईल”, असं धैर्यशील माने राजू शेट्टी यांच्या आईला म्हणाले. “माझा आशीर्वाद लय मोठा आहे. माझा लेक सर्वांना धरुन आहे, तसं तुम्हीही लोकांना धरुन राहा”, असा आशीवार्द राजू शेट्टींच्या आईने धैर्यशील माने यांना दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुकांपूर्वी पुलवामासारखा आणखी एक हल्ला घडविला जाईल !

News Desk

जाणून घ्या…शिंदे सरकारमधील अनुभवी सुधीर मुनगंटीवार यांच्या काही खास गोष्टी

Aprna

झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी पंढरपुरात जाणार !

News Desk