HW News Marathi
राजकारण

RamMandir : भीतीपोटी अयोध्येतून हजारो मुस्लिमांचे स्थलांतर

अयोध्या | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात २५ नोव्हेंबरला अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह आज अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. शिवसेनेचा अयोध्या दौरा आणि त्याच दिवशी असलेली विश्व हिंदू परिषदेची धर्मसंसद यामुळे अयोध्येतील जनतेमध्ये विशेषतः मुस्लिम नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नॅशनल हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, सुमारे ३,५०० मुस्लिम नागरिकांनी भीतीपोटी शहर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.

शिवसेना हा पक्ष म्हणजे एक अत्यंत कट्टर आणि उग्र अशी संघटना आहे, असा अयोध्येतील जनतेचा समज आहे. याच भीतीपोटी अयोध्येतील मुस्लिम नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी शहर सोडून इतर ठिकाणी स्थलांतर केले आहे. १९९२ सालसारखा प्रकार पुन्हा घडू नये इतकेच अयोध्येतील नागरिकांचे म्हणणे आहे. शिवसेनेचा अयोध्या दौरा आणि त्याच वेळी असणारी विश्व हिंदू परिषदेची धर्मसंसद यामुळे अयोध्येची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली आहे. त्यासाठी अयोध्येत आरएएफ आणि दहशतवादविरोधी पथके तैनात करण्यात आली आहेत.

शिवसेनेचा अयोध्या दौरा आणि विश्व हिंदू परिषदेची धर्मसंसदेमुळे अयोध्येत सध्या मोठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला तर खबरदारी म्हणून नागरिकांनी आधीच आपल्या घरामध्ये धान्याचा साठा करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, “मुस्लिम नागरिकांच्या सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही घाबरण्याचे काही कारण नाही”, असे आश्वासन फैजाबादचे पोलीस अधीक्षक अनिल कुमार सिंह यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवस्मारक हे पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात !

News Desk

बजरंग दलाचे सर्मथक, कन्हैया कुमारमध्ये हाणामारी

swarit

बीजेपी से बेटी बचाओ

News Desk