HW Marathi
राजकारण

तुम्हाला तिथे बसायची संधी मिळाली, म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो !

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे त्याच्या अनोख्या कवितांसाठी, चारोळ्यांसाठी भलतेच प्रसिद्ध आहेत. लोकसभेच्या सभागृहातही रामदास आठवले यांनी आज (१९ जून) आपल्या चारोळ्यांनी मोठी गंमत आणली. प्रथम आठवले यांनी नुकतीच लोकसभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या राजस्थानमधील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांचे कवितेतून अभिनंदन केले. “एक देश का नाम है रोम, लेकिन लोकसभा के अध्यक्ष बन गये है बिर्ला ओम”, अशी कविता करत आठवले यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. त्यानंतर, रामदास आठवले यांनी आपला मोर्चा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे वळवत त्यांना टोला देखील लगावला.

“तुम्हाला तिथे बसायची संधी मिळाली, म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो”, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांनी लगावला. “तुम्ही बरीच वर्षे सत्तेत राहिला आहात. तुम्ही सत्तेत होतात तेव्हा मी तुमच्यासोबत होतो. आज मी इकडे आहे. या निवडणुकांपूर्वी लोक मला म्हणत होते कि, काँग्रेसमध्ये या. मी म्हटले, मी तिथे येऊन काय करू ? मी हवेचा रोख ओळखून मोदींसोबत जाण्याचा निर्णय घेतला. हवा मोदींच्या बाजूने होती. आता, आम्ही निवडणुका जिंकलो आहोत. ही ५ वर्षे आमची आहेत. यापुढची ५ वर्षे, आणि त्यापुढची देखील ५ वर्षे आमचीच असेल कारण आम्ही चांगले काम करणार आहोत. आम्ही चांगले काम केले नाही तर तुम्ही सत्तेत याल. मात्र, आम्ही चांगलेच काम करू”, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

Related posts

राहुल गांधी-चंद्रबाबू नायडू यांची भेट

News Desk

प्रियांका गांधी गंगेचे पाणी पिऊ शकल्या इतकी गंगा स्वच्छ आहे !

News Desk

उदयनराजेंनी राजीनामा देऊन तेथील लोकांना त्रास देऊ नये !

News Desk