HW News Marathi
राजकारण

तासगावात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा जोरदार मोर्चा, नाराज गटाने मोर्चाकडे फिरवली पाठ ?

तासगाव | तासगाव व कवठेमहांकाळ तालुके दुष्काळ जाहिर करावेत असे दोन्ही तालुक्याच्या वतीने तासगाव तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात तासगाव बाजार समिती मधून दुपारी २ वाजता झाली. मोर्चा एस स्टि स्टँड मार्गे गणपती मंदिर,सांगली नाका ते तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला, मोर्चात कोण म्हणत देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही, अमर रहे अमर रहे स्व आर आर आबा पाटील अमर रहे, भाजप सरकार हाय हाय,मोदी सरकार हाय हाय,फडणविस सरकार हाय हाय घोषणा देत तासगाव राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने आमदार सुमन आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला. मोर्चाच्या मागण्याचे फलक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या हातात दिसत होते.

मोर्चातील प्रमुख मागण्या

चारा छावण्या उभ्या कराव्यात.

तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा. विजबिले माफ़ करावीत.

विजेचे भारनियमन रद्द करावे. सर्व सिंचन योजना आरफळ ताकारी टेंभू व म्हैशाळ पूर्ण क्षमतेने सुरु कराव्यात.

मोर्चाला शरद शेळके शेकाप,अजित पाटील संभाजी ब्रिगेड,यांनी पाठिंबा दिला,मोर्चात ताजुद्दीन तांबोळी,गजानन खुजट,सजंय पाटील वड़गाव,खंडू पवार स्वप्निल पाटील यांनी सरकारवर कडाडून हल्ला केला,आता हां तहसिल कार्यालयावरील मोर्चा साधा असून आता पुढील मोर्चा हातात दगडे व शेतकऱ्यांचे रुमने हातात घेउन आमदार सुमनताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर असणार आहे.आमदार सुमन आर पाटील या भाषणासाठी उठताच सर्व आंदोलन कर्त्यानी अमर रहे अमर रहे आर आर आबा अमर रहे,सुमनताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणानी तहसिल कार्यालय परिसर दणाणून गेला.

सुमन पाटील यांनी निवेदन वाचुन दाखवले व सरकारला इशारा दिला हां शेवटचा मोर्चा शांततेत आहे. या पुढील मोर्चा हां शेतकऱ्याचे रुमने हातात घेउन जिल्हाधीकारी कार्यालयावर असेल. माझे सर्व कुटुंब पुढील मोर्चात रुमने हातात घेउनच रस्त्यावर उतरेल. सरकारने अगोदरच शहाणे होउन तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व मागण्या मान्य कराव्यात असा गर्भित ईशाराही यावेळी दिला.

मोर्चात कवठेमहांकाळच्या अनीता सगरे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, हणमंत देसाई,डीके पाटील, दत्ता हावळे, यांचीही भाषणे झाली सर्वांनीच भाजप सरकारवर जोरदार टिका केली, मोर्चात पतंगबापू पाटील, शंकरदादा पाटील, सुरेशभाऊ पाटील, पितांबर पाटील, वर्षा वाघमारे, अमोल शिंदे, अमोल पाटील,रविंद्र पाटील,खंडू कदम, कमलेश तांबेकर,उत्कर्ष जाधव, शुभम पाटील, अर्जुनबापू पाटील, शुभांगी साळुंखे, बाळासाहेब सावंत, मनीषा माळी, पूनम माळी, आदि मान्यवर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंनी शपथ घेण्याआधीच अजित पवारांना क्लीनचिट

Gauri Tilekar

मोदींच्या जाहीरसभेत भाजपच्या एका मंत्र्यांकडून महिला मंत्र्यांचा विनयभंग

News Desk

महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्या निधी चौधरींना निलंबित करा !

News Desk