HW News Marathi
राजकारण

रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ मुंबई सरचिटणीस पदी रतन अस्वारे यांची नियुक्ती

मुंबई | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मरोळ अंधेरी येथील ज्येष्ठ रिपब्लिकन कार्यकर्ते समाजसेवक रतन आस्वारे यांची रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाच्या मुंबई प्रदेश सरचिटणीस पदावर अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे तसेच रिपाइं मुंबई प्रदेश झोपडपट्टी महासंघाच्या उपाध्यक्ष पदावर भीमराव विठल कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बांद्रा येथील संविधान निवासस्थानी केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्याहस्ते रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे नवनियुक्त पदाधिकारी रतन अस्वारे आणि भीमराव कांबळे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला .यावेळी रिपाइं झोपडपट्टी महासंघाचे मुंबई अध्यक्ष सुमीत वजाळे हेही उपस्थित होते.

मुंबईत झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्या गरीब जनतेच्या पुनर्वसनाचा प्रश्न अती गंभीर झाल्यामूळे झोपडीवासीयांना त्यांचे अधिकार मिळवुन देण्यासाठी रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपाइं ने पुन्हा कंबर कसली असुन त्यासाठी रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या क्षेत्रात काम करणारे अनुभवी अभ्यासू कार्यकर्ते सुमीत वजाळे यांची रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून आज रतन अस्वारे यांची महासंघाच्या मुंबई प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती केल्यामुळे कित्येक वर्षे झोपडपट्टी वासीयांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याची योग्य नियुक्ती केल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता हैदराबादचेही नाव बदलणार ?

News Desk

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून शरद पवार, अजित पवार यांच्यातच मतभेद

News Desk

भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये !

News Desk