HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

गडचिरोलीत आज ४ मतदान केंद्रांवर फेरमतदानाला सुरुवात

गडचिरोली । गडचिरोलीमध्ये ४ मतदान केंद्रांवर आज (१५एप्रिल) फेरमतदान होणार आहे. नक्षलवादी कारवायांमुळे मतदान न झाल्यामुळे गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात ११० वाटेली, ११२ गारडेवाडा, ११३ गारडेवाडा (पुस्कोटी) ११४ गारडेवाडा (वांगेतुरी) येथे आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीमध्ये मतदानापूर्वीच नक्षलवाद्यांचा हैदोस पाहायला मिळाला होता. नक्षलवाद्यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. मतदानाच्या दिवशीही पोलिसांसोबत चकमक, सी ६०कमांडो पथकावर हल्ला अशा त्यांच्या कुरापती सुरुच होत्या. स्फोटानंतर सुरु असलेले ऑपरेशन आणि सततच्या गोळीबारामुळे निवडणूक अधिकारी संबंधित चार केंद्रांवर वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे इथलं मतदान पुढे ढकलण्यात आले होते.

११० वाटेलीमध्ये रूम नं १ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा, ११२ गारडेवाडा,-रूम नं २ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा, ११३ गारडेवाडा (पुस्कोटी) रूम नं ३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा तर ११४ गारडेवाडा (वांगेतुरी) रुम नं ४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा येथे मतदान होणार आहे. गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अंतिम ७२.०२ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे मिळाली आहे.

 

Related posts

नितीश कुमार यांचा लालूप्रसाद यांना फोन, राजकीय चर्चांना उधान

News Desk

‘मुख्यमंत्री हजर नसताना तुम्ही कसले भूमीपूजन करत होतात ?’

Gauri Tilekar

जर पंतप्रधान तुमचा होणार असेल, तर मुख्यमंत्रीपद आम्हाला द्या !

News Desk