HW News Marathi
राजकारण

मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल मागासवर्ग आयोगाकडून मुख्य सचिवांकडे सुपूर्द

मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील अहवाल आज राज्य मागासवर्ग आयोगाकडून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. हा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाकडून मुख्य सचिव डी. के जैन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा सरकारला प्राप्त झाला आहे. या अहवालावर अभ्यास करुन पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्य सचिव डी. के. जैन यांनी दिली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल तयार केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध करताना शशी थरुर म्हणाले…

Darrell Miranda

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

राहुल गांधी आज वायनाड दौऱ्यावर

News Desk
मुंबई

ओला-उबर १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपावर

News Desk

मुंबई | गेल्या १५ दिवसांपूर्वीच ओला उबर टॅक्सीचालकांनी तब्बल १२ दिवस संप पुकारला होता. ज्यामध्ये मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रातील ओला उबर टॅक्सीचालक सहभागी झाले होते. त्यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा होऊनही कोणतेही ठोस निर्णय न झाल्याने टॅक्सीचालक-मालकांनी येत्या १७ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा संपाची घोषणा केली आहे.

‘सरकारी पातळीवरील चर्चा होउनही आमच्या कोणत्याही मागण्या पूर्ण न झाल्याने, तसेच दोन ते तीन वेळा मीटींग घेऊन आश्वासन देउनही ओला, उबर कंपन्यांकडून कुठलेही आश्वासन पाळण्यात आले नाही. त्यामुळे आमच्यावर पुन्हा संप करण्याची वेळ आली आहे. यामध्ये १७ नोव्हेंबरपासून संप पुकारण्यात येईल तर १९ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत, असे मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात हा संप पुकारण्यार येणार आहे. तब्बल ६० हजार गाड्यांचे चालक मालक या संपात सहभागी होतील. ‘कॅब चालकांना चांगला परतावा मिळावा, ऑनलाईन कॅबचं किमान भाडं १०० ते १५० रुपये असावं, प्रति किलोमीटर १८ ते २३ रुपये भाडं लावावं’, अशा मागण्या ओला-उबर चालकांनी केल्या आहेत.

Related posts

हा विजय वेगळाच – उद्धव ठाकरे

News Desk

दिवा रेल्वे स्थानकात प्रवाश्यांचं आंदोलन

News Desk

मुंबई व गोवा क्रुझ सेवा सुरु होणार

News Desk