HW News Marathi
राजकारण

रिपब्लिकन कार्यकर्त्यांसाठी सत्तेतील वाटा  मिळवून देणारच | आठवले

मुंबई | महाराष्ट्र राज्य सरकार मधील रिपब्लिकन पक्षाचा सत्तेचा वाटा रिपब्लिकन कार्यकर्त्यांसाठी मिळविणारच आहे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगत सत्तापदे सर्वच कार्यकर्त्यांना मिळतील असे नसून ज्यांना सत्तापद मिळणार नाही त्या सर्व कार्यकर्त्यांसाठी माझे मंत्रिपद हीच त्यांची सत्तेची ताकद असल्याचे समजून पक्षवाढीसाठी जोमाने काम करावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. रिपब्लिकन पक्षाचा यंदाचा 61 वा वर्धापन दिन ठाणे शहरातील मैदानात आयोजित करण्यात आला आहे.

रिपाइंच्या 3 ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या स्थापनादिनानिमित रिपब्लिकन पक्षाचे प्रचंड शक्तिप्रदर्शन घडाविण्यासाठी आयोजित केलेल्या मुंबई ठाणे जिल्ह्यातील रिपाइं कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठकीत रामदास आठवलेंनी मार्गदर्शन केले . त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर ठाणे जिल्हा अध्यक्ष राम तायडे; राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर ; मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; ठाणे प्रदेश निरीक्षक सुरेश बारशिंग; काकासाहेव खंबाळकर;सुरेश सावंत ; श्रीकांत भालेराव; अण्णा रोकडे; दयाळ बहादूरे; भास्कर वाघमारे; अनिल गांगुर्डे; मुस्ताक बाबा; सोना कांबळे; प्रकाश जाधव ;बाळासाहेब गरुड; बाळाराम गायकवाड; प्रल्हाद जाधव; साधू कटके ; बाळासाहेब मिरजे; मधू मोहिते; महेंद्र शिर्के ; उदयराज तोरणे; हेमंत रणपिसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

राज्यात भाजप शिवसेना महायुती सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाला 5 टक्के सत्तेतील वाटा मिळविणार असून त्या अंतर्गत राज्यात एक मंत्रिपद आणि दोन महामंडळ अध्यक्षपदे तसेच 40 महामंडळाची सदस्य पदे रिपब्लिकन पक्षाला मिळविणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. मुंबईत एक हजारहुन रिपब्लिकन कार्यकर्ते एस ई ओ झाले आहेत. त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यांमध्ये रिपाइं कार्यकर्त्यांना एस ई ओ पद मिळवून देणार असल्याचे आश्वासन रामदास आठवलेंनी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संसदेचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान होणार

News Desk

राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य तारिक अन्वर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

पेट्रोल पंपांवर मोदींचा फोटो, दरवाढीचा फलकही लावा! – उद्धव ठाकरे

News Desk