HW News Marathi
राजकारण

साध्वी प्रज्ञा यांनी केला पक्षाची शिस्त पाळण्याचा संकल्प

नवी दिल्ली | भोपाळ मतदारसंघाच्या भाजपच्या नवनिर्वाचित खासदार साध्वी प्रज्ञा यांच्या नथुराम गोडसेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे, “त्या वक्तव्यासाठी मी साध्वी प्रज्ञा यांना कधीही मनापासून माफ करणार नाही”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली होती. पंतप्रधान मोदींच्या या नाराजीनंतर आता साध्वी प्रज्ञा यांनी यापुढे शिस्तीने वागण्याचा, पक्षाची शिस्त पाळण्याचा संकल्प केला आहे. त्याचप्रमाणे, साध्वी प्रज्ञा यांनी मोदींना भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान त्यांनी गोडसेबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांप्रकरणी भाजपने १७ मे रोजी साध्वी प्रज्ञा यांना बजावलेल्या नोटिशीला उत्तर देताना प्रज्ञा सिंह यांनी उत्तर दिले आहे.

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान साध्वी प्रज्ञा या आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वारंवार मोठ्या वादात सापडत होत्या. साध्वी प्रज्ञा यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांप्रकरणी पंतप्रधान मोदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा यांना अद्याप माफी मिळालेली नाही. इतकेच नव्हे तर भोपाळ मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी जेव्हा मोदींची भेट घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे, मोदी अद्याप साध्वी प्रज्ञा यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या.

“नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील”, असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर “साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेबाबत केलेले वक्तव्य हे अत्यंत घृणास्पद असून त्यांनी याबाबत माफी मागितली असली तरीही मी कधीही त्यांना मनापासून माफ करू शकणार नाही”, अशी बोचरी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली होती. “साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेले विधान हे टीकेच्या योग्यतेचेच आहे. सभ्य समाजात अशी भाषा, अशी वक्तव्ये होता कामा नयेत”, असेही मोदी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपची शिवसेनेला ‘उपसभापती’ ची ऑफर

News Desk

पंतप्रधान मोदींचा फोन घेण्यास ममता दीदींचा नकार

News Desk

मोदींनी शेतकऱ्यांसह तरुणांना फसविले | राहुल गांधी

News Desk