मुंबई | “साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या महान संत आहेत. साध्वी प्रज्ञा यांच्याशी माझी तुलना होऊच शकत नाही. मी एक सर्वसामान्य मनुष्य आहे”, असे वक्तव्य भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी केले आहे. उमा भारती या मध्य प्रदेशमधील खजुराहो मतदारसंघाच्या उमेदवार बीडी शर्मा यांच्या प्रचारसभेत माध्यमांशी बोलत होत्या. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा यांना भाजपकडून भोपाळमधून उमेदवारी देण्यात आल्यानंतर भाजपवर प्रचंड टीका झाली. मात्र, पंतप्रधान मोदींसह भाजपकडून साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीचे कायमच समर्थन करण्यात आले आहे.
Union Minister and BJP leader Uma Bharti on being asked if Pragya Singh Thakur will take her place in Madhya Pradesh politics: She is a great saint, don't compare me with her, I'm just an ordinary and foolish creature. (27.4.19) pic.twitter.com/rxfgDoRTFf
— ANI (@ANI) April 28, 2019
साध्वी प्रज्ञा यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान करून स्वतःवर वाद ओढवून घेतला. मात्र, “ते साध्वी प्रज्ञा यांचे वैयक्तिक मत आहे” असे म्हणत त्यावेळी भाजपने या प्रकरणातून आपले हात वर केले. त्यानंतर देखील भाजपकडून साध्वी प्रज्ञा यांच्या या वादग्रस्त वक्तव्याबाबत कोणतीही कठोर भूमिका घेण्यात आली नाही. आता तर चक्क भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी साध्वी प्रज्ञा यांचा उल्लेख ‘महान संत’ असा केला आहे. दरम्यान, आता राजकीय वर्तुळात या प्रकरणी काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.