HW News Marathi
राजकारण

साध्वी प्रज्ञा यांचा भाजपमध्ये प्रवेश, भोपाळमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

नवी दिल्ली | साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी (१७ एप्रिल) भाजपमध्ये प्रवेश केला असून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. साध्वी प्रज्ञा या भोपाळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात लढणार असल्याची माहिती मिळत आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भोपाळ भाजपच्या कार्यालयात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अन्य भाजप नेत्यांची भेट घेतली.

दीर्घ चर्चेनंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण भाजप प्रवेश केल्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे आपण लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे देखील त्या म्हणाल्या. “मी निवडणूक लढवेन आणि जिंकेनसुद्धा. मात्र, माझा मतदारसंघ अद्याप निश्चित नाही”, असेही साध्वी प्रज्ञा यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान, त्या भोपाळ मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, संध्याकाळी ४ च्या सुमारास साध्वी प्रज्ञा याबाबतची माहिती देणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री फडणवीसांनी का फिरवली पाठ ?

News Desk

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk

राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला मोठा धक्का; मलिक-देशमुखांचा मतदानाचा अर्ज फेटाळला

Aprna