HW News Marathi
राजकारण

लोकसभा निवडणुकीत महिलांसाठी ‘सखी मतदान केंद्र’

मुंबई | निवडणुकीत महिलांचा मतदानात सहभाग वाढविण्याकडे केंद्र सरकारने लक्ष केले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरातील प्रत्येक मतदार संघातील व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातही सखी मतदान केंद्र ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र असणार असून याला’सखी मतदान केंद्र’ असे म्हटले जाणार आहे. सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. या सखी मतदान केंद्रात तैनात असलेल्या महिला त्यांच्या आवडीच्या कोणत्याही रंगाचा पोशाख परिधान करू शकतात. ‘सखी मतदान केंद्र’अधिकाधिक आर्कषक आणि सुंदर बनविण्यासाठी रांगोळी,रंगरंगोटीसह येथील साफ सफाईवर विशेष भर देण्यात येणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत महिला शक्ती निर्णायक भूमिका मांडणार आहे. २०१४ च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का ८८९ वरुन ९११ असा वाढला आहे. २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेता संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार ?

News Desk

पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेत आणखी २२ जागा सील करणार

News Desk

देशभरात ‘या’ सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

News Desk